ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी त्यात भर घालावी लागते. पण विचारांत प्रगल्भता येते का त्याने? विचारांच्या प्रगल्भतेसाठी, परिपक्वतेसाठी त्याग करावा लागतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मध, मत्सर ह्या षड्रिपूंचा त्याग. काहीतरी मिळवण्याचा अती-अट्टाहास सोडावा लागतो. निसर्गनियमाप्रमाणे बहरावे लागते. आणि कितीही वाटले तरी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत हा गैरसमज सोडावा लागतो. लक्षात ठेवा, आपण एक निमीत्त केवळ असतो.