जग ज्यांना अतिशय चाणाक्ष पंडित म्हणून ओळखते अश्या "चाणक्य" ह्यांनी म्हटले आहे, "आत्मसम्मानाच्या पतनाने व्यक्तीच्या विकासाचेही पतन होते." आत्मसम्मान असणे हा एक व्यक्तीमत्व विकासाचा मुलभूत पाया आहे. त्यामुळेच व्यक्ती आत्मविश्वास, प्रेम, शौर्य, सहकार्य, इ. ईतर पैलू व्यवस्थित साकारू शकते.